Home » युरेशियन ग्रिफॉन प्रजातीच्या गिधाडाची अंजनेरीत ‘उंच भरारी’

युरेशियन ग्रिफॉन प्रजातीच्या गिधाडाची अंजनेरीत ‘उंच भरारी’

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या निफाड येथे बंबल फूट आजाराने ग्रासलेल्या दुर्मिळ अशा युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला वाचवण्यात यश आल आहे. अत्यवस्थ अवस्थेत येवल्यात रेस्क्यू करण्यात आलेल्या युरेशियन गिफ्रॉन प्रजातीच्या दुर्मिळ गिधाडावर महिनाभराच्या उपचारानंतर अंजनेरीच्या डोंगररांगांमध्ये पूर्व वनविभागाने मुक्त केले.

येवला वन परिक्षेत्रात डिसेंबरमध्ये अत्यवस्थ अवस्थेत निफाडमध्ये गिफ्रॉन गिधाड आढळून आले होते. स्थानिक वचनविभागच्या पथकाने त्याला रेस्क्यू केले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वनविभागाने त्याची तपासणी केली असता त्यास बंबल फ्रुट नावाचा आजार असल्याचे निदान करण्यात आले. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी गिधाड संवर्धन अभियानात योगदान देण्याची हिच संधी असल्याचे सांगून या गिधाडाला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचे आदेश दिले.

सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी पुढाकार गेट गिधाडाला वन्यजीव प्रेमींच्या मदतीने नाशिक शहरात पुढील उपचारासाठी स्थलांतरित केले. तब्बल महिनाभर हे गिधाड देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर गिधाडांची प्रकृती ठणठणीत झाल्या नंतर त्याला अंजनेरी येथील गिधाडांच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले आहे. सोडताना गिधाडाने उंच भरारी मारली..विशेष म्हणजे हा गिधाडावरचा पहिलाच यशस्वी उपचार प्रयोग झाला.

भारतातून नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या निसर्गाच्या स्वच्छतादूत अर्थात गिधाडांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशिकमधील अंजनेरी, ब्रम्हगिरी ते हरसूल वाघेरा घाट हा गिधाडांचा कॉरिडॉर समजला जातो. मात्र हा कॉरिडॉर हा सुरक्षित राहण्यासाठी गिधाड सुरक्षित क्षेत्र निर्माण होण्याची गरज आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!