नाशिक । प्रतिनिधी
कोर्टाचे वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना अयोध्यानगरीतील त्रिकोणी गार्डन येथे घडली आहे.
या प्रकरणी संशयित मथियस ऑग्स्तुस एक्का, ललिता मथियस एक्का, रोहित मथियस एक्का, रोहित मथियस एक्का, लवीन मथियस एक्का यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संशयितांच्या घरी न्यायालयाचे झडती वॉरंट बजावण्यास गेले असता संशयितांनी पोलीस पथकावर हल्ला केला.
या प्रकरणी उपनिरीक्षक पंकज सोनावणे यांच्या तक्रारीनुसार संशयिताच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.