Home » नाशिकला झालंय काय? दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

नाशिकला झालंय काय? दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

by नाशिक तक
0 comment

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावत चालली असून आजतर गुन्हेगारांनी कहरच केला आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोरून दिवसाढवळ्या तरुणीला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली आहे. मार्केट यार्डच्या रस्त्यावरून काका सोबत पायी चालणाऱ्या तरुणीची छेड काढत काही गुंडानी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीच्या काकांनी या गुंडांशी दोन हात करत केले. यावेळी मुलीने आरडा ओरडा करताच जवळ असलेल्या पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी धावून आल्याने या अपहरणकर्त्यांचा अपहरणाचा डाव फसला.

या घटनेत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असुन वाढत्या अपहरण, चेन स्नॅचिंग, विनयभंगाच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण होते. त्यात आणखी एक अशी अपहरणाची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेने शहरात मुली कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

एकीकडे नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीविरुद्ध चांगलीच मोहीम राबविली असतांना दुसरीकडे मात्र शहरात सर्रास गुन्हे घडत आहेत. यावर वचक निर्माण करण्याऐवजी पोलीस हेल्मेट सक्तीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!