नाशिक | प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नाशिक प्रशासन सज्ज झाले असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सुरू होणार १६ कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढ असून मागील दोन दिवसांत हजाराचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोविड रुग्णसंख्या वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे.
यासाठी ग्रामीण भागात विविध ठिकाणी १६ कोविड सेंटर सुरू करण्यात येतील. तर नगरपालिकेच्या ठिकाणी डिसीएचसी सेंटर उभारण्यात येणार आहेत. या जिल्हा परिषदेच्या १६ कोविड सेंटर मध्ये १८५० खाटाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी करोना बधितांचा आकडा हजार पार केला आहे. काल एका दिवसात १०५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र दिलासादायक असे की सलग तिसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य आहे. मात्र बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.