सुरगाणा येथे ‘हर घर तिरंगा’ साठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती

सुरगाणा : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुरगाणा येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त अनेक उपक्रम राबवले जात असून त्या मोहिमे अंतर्गत प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकावण्यासाठी भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे.

या मोहीमेची जनजागृती करण्यासाठी नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरगाणा व नगरपंचायत सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरगाणा गावातील प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. पी. के. चव्हाण , पर्यवेक्षक के. एन. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागाचे श्री बी. वाय. भोये, महेश देसले यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री पी. बी. खैरनार श्री पी ए चव्हाण, टी, जी. त्रिभुवन, तसेच सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होत्या.