Home » त्र्यंबकला विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे कोरोनाची जनजागृती

त्र्यंबकला विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे कोरोनाची जनजागृती

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथे मविप्र महाविद्यालयाच्या वतीने पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये ‘घरोघरी लसीकरण’ या उपक्रमांतर्गत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लसीकरणाबाबत नागरिक अद्यापही उदासीन आहे. त्यामुळे घरोघरी लसीकरण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरात मविप्र महाविद्यालयाच्या वतीने जगजागृती फेरी काढण्यात आली. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच लसीकरणाचा वेग वाढून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी, तिसरी लाट येऊ नये यासाठी तयारी म्हणून अद्यापही करोनासंसर्ग, लसीकरण, आरटीपीसीआर, रॅपिड टेस्ट, लसीकरणाबाबत याबाबत समज – गैरसमज दूर करण्यासाठी हे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पथनाट्य सादर केले आहे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद थोरात, प्रा. विनायक पवार यांच्यासह इतर प्राध्याकपाक वर्ग उपस्थित होते. यावेळी शहरातील आंबेडकर चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त, निवृत्तीनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर बस स्थानक आदी परिसरात पथनाट्य सादर केले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!