शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमबहुचर्चित आनंदवल्ली खून प्रकरणांतील दोघांना जामीन

बहुचर्चित आनंदवल्ली खून प्रकरणांतील दोघांना जामीन

नाशिक । प्रतिनिधी

बहुचर्चित आनंदवल्ली खून प्रकरणातील दोघांना जामीन मंजूर झाला आहे. बाळासाहेब कोल्हे आणि जिम्मी राजपूत यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी आनंदवल्ली येथे रमेश मंडलिक यांचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली होती. वरवर हा वाद किरकोळ स्वरूपाचा असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मंडलिक यांची हत्या हा मोठ्या नियोजनाचा भाग असल्याचे पोलिस तपासात निष्पण झाले होते. या प्रकरणी नाशिकमधून बड्या हस्तीना अटक करण्यात आली होती. तर वृद्धाच्या खुनाचा नियोजनबध्द कट रचून सुपारी देणारा रम्मी राजपूतला देखील अटक करण्यात आली होती.

यानंतर वेळोवेळी आरोपींच्या माध्यमातून जामीन अर्ज करण्यात येत होता. मात्र न्यायालय हि याचिका सतत फेटाळत होते. मात्र आज या प्रकरणातील बाळासाहेब कोल्हे व जिम्मी राजपूत यांना जामीन मिळाला आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप