नव्या वर्षात मिळणार ‘इतक्या’ शासकीय सुट्या

नाशिक। प्रतिनिधी
लवकरच २०२१ हे वर्ष संपून जग नवीन वर्षात पदार्पण करेल. प्रत्येकाला काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या २०२२ या नव्या वर्षाची प्रतीक्षा आहे. मात्र शासकीय नोकरदारांना यापेक्षा येणाऱ्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असतील हा प्रश्न सतावत असतो. मात्र, २०२२ मध्ये शनिवार-रविवारच्या दिवशी अनेक सुट्ट्या येत असल्याने विकेंड सुट्टीला सुट्टी मिळणार असल्याने नोकरदारांची घोर निराशा होणार आहे.

नवीन वर्ष थोड्याच दिवसांत सुरु होणार असून याची सुरवातच शनिवारपासून होत आहे. त्यामुळे पहिलाच विकेंड सुट्टीचा दिवस वाया जाणार आहे. दरम्यान राज्य शासनाने सुट्ट्यांची अधिसूचना काढली असून त्यानुसार नवीन वर्षात शासकीय सेवकांना १६ शासकीय सुट्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मार्च महाशिरात्री, १८ मार्च होळी, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, याच दिवशी महावीर जयंती, १५ एप्रिल गुड फ्रायडे, ३ मे रमजान ईद, १६ मे बुद्ध पौर्णिमा ९ ऑगस्ट मोहरम, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट पारशी नववर्ष, ३१ ऑगस्ट गणेश चतुर्थी, ५ ऑक्टोबर दसरा, २४ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २६ ऑक्टोबर बलिप्रतिपदा, ८ नोव्हेंबर गुरुनानक जयंती. दि. १ एप्रिल २०२२ रोजीची सुटी बँकांसाठी मर्यादित आहे.

तर विकेंडला अनेक सॅन उत्सव आहेत. त्यामध्ये ५ फेब्रुवारी वसंत पंचमी, 20 मार्च रविवारी शिवजयंती. अशा प्रकारे ईस्टर, गुड फ्रायडे, मोहरम, महात्मा गांधी जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, छठ पूजा, मिलाद-उन-नबी आणि ख्रिसमस हे सण वीकेंडला येत आहेत. त्यामुळे वर्षभरात एकूण १२ सुट्ट्या वाया जाणार आहेत.