पतंग उडू चला गड्यानो, पतंग उडवू चला, पण…!

नाशिक । प्रतिनिधी

पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतत असल्याने शहर आणि जिल्ह्यात या मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. या मांजाच्या निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून जिल्हा प्रशासन नायलॉन मांजा विरोधात मोहीम राबवणार आहे.नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर पावलं उचलण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी बंदी असून देखील मांजा विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्याने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नायलॉन मांज्याने आता पर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी घातली गेली आहे.

संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, पतगंबाजीला आतापासूनच उधाण आले आहे. पतंग उडविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजाचा वापर वाढला असून, या मांजाला असलेल्या धारेमुळे आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत. पक्ष्यांनीदेखील जीव गमावला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नायलॉन मांजा बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान नायलॉन मांजा हा पक्षी तसेच माणसांसाठीदेखील मांजा जीवघेणा ठरत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मांजा विरोधात विरोधात प्रशासन गंभीर आहे. मांजा अनेकांच्या जीवावर बेतला आहे. धारदार नायलाॅन मांजाने अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. वाहनावरून जाताना नायलाॅन मांजाने गळा चिरून अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.