सावधान ! नाशिकच्या कसारा घाटात रस्ता खचतोय; काळजीने करा प्रवास

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) जुन्या कसारा घाटात रस्त्याला मोठ-मोठाले तडे गेले (There were big cracks in the road) आहेत. त्यामुळे जुन्या कसारा घाटातील रस्ता पुन्हा खचण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्ष अगोदर हाच घाट रस्ता खचला होता. अशात पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 (National Highway No.3) असलेल्या मुख्य महामार्गालाच अक्षरशः तडे गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासनचे याकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दोन महिन्या अगोदर या मार्गावरील तळे निरीक्षणात आले होते मात्र अगोदर या तड्यांची तीव्रता कमी होती. तरीही दुरुस्तीच्या नावाखाली फक्त डांबर या ठिकाणी ओतलं गेलं. त्यानंतर आता पुन्हा अक्षरश: मोठमोठ्या भेगा पडल्याने महामार्ग खचण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाहन चालकांचा जीव धोक्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघतेय की काय ? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

आठवड्याभरापासून नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार बॅटिंग केली (nashik heavy rain) आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. शेतकरी, व्यवसायिक यांचेही प्रचंड नुकसान झालेय तर अनेक ठिकाणी घर कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या पावसाचा परिणाम रस्त्यांवर देखील झालाय. नाशिकहून मुंबईकडे जाणारा महामार्गावर कडे गेली असून कसारा घाटात रस्ता खचण्याच्या मार्गावर आहे. रस्ता खचण्याचं हे प्रमाण वाढत चाललं असल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पहा व्हिडियो

या मार्गावर २०० फूट अंतरावर मोठमोठे तडे गेले आहेत. या तड्यांमुळे मार्गाला एक फुटापेक्षा अधिक रुंदीच्या भेगा (Cracks in the road more than one foot wide) पडल्या आहेत. या फटींमध्ये वाहने फसण्याचा धोका आहे. मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी रस्त्याला तडे गेले होते. मात्र, महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्याला दोन वर्षानंतर पुन्हा तडे गेल्याने त्याच्या कामाचा दर्जा चर्चेत आला आहे. याच महामार्गावर खड्ड्यांचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्याचीच अशी अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त होत