Home » भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी

गानकोकिळा लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली असून त्यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले असून तज्ञ डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

लता मंगेशकर यांना रविवारी रात्रीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रीतम समदानी यांच्यासह इतर पथक उपचार करीत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!