मोठी कारवाई. आंतरराज्य टोळीतील एटीएम मशीन फोडणारा अटकेत..

नाशिक:- 26 ऑगस्ट रोजी पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएमची गूगल मॅपद्वारे माहिती घेट गॅसकटरने फोडून 28 लाख 35हजार रूपये  चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. (nashik city police)

या गुन्ह्याचा तपास असताना एटीएम फोडणाऱ्या टोळीतील  हरियाणातील काही सदस्य नाशिक  जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.नाशिक  जिल्ह्याच्या सीमा भागात वाहनांची तपासणी करत असताना संशयित आरोपी इराशाद खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले अहमदनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली.(ershad khan hariyanaa)

त्याने साथीदाराच्या मदतीने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडल्याची कबुली दिली. पोलीस पथकाचे हेमंत पाटील, सागर कोते, नाना शिरोळे, विश्वनाथ काकड, गणेश शिंदे, नवनाथ सानप, हेमंत गिलविले, यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.(shahaji umap)

संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पथकाला दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले आहे. या टोळीवर मध्य प्रदेश, हरियाणा, सह राज्यातील अहमदनगर,लातूर, हिंगोली, औरंगाबाद, येथे एटीएम  आणि जनावरे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरु असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे नाशिक शहरात अनेक दिवसांपासून वेग्वेग्ल्याचे प्रकारचे गुन्हे घडत आहे. यासंदर्भात नाशिक पोलिसांकडून चोख खबरदारी घेत एक व्हाटसप क्रमांक जरी करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कुठे काही चुकीची घटना गुन्हा घडत आसल्यास तात्काळ नाशिक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या व्हाटसप क्रमांकवर संपर्क करावा आसे आव्हान नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. आसे असूनही नाशिक शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी अद्यापही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.