मोठी कारवाई…. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कामगिरी

नाशिक:- गणेशोत्सव(ganesh festival)आगदी काही दिवसांवर येऊन पोहचला आसताना शासनाकडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहरातील द्वारका परिसरातील एका ट्रॅव्हल्सच्या दुकानात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने(Department of Food and Drug Administration) छापा टाकून तब्बल ११०० किलोचा बनावट खवा जप्त केला आहे. गणेशोत्सव काळात अनेकजण आपल्या आवडीचे पदार्थ बनवत असतात. त्यासाठी विविध कच्या पदार्थांची खरेदी करत असतात. आशा बनावट पदार्थांमुळे आरोग्यास हानी पोहचते.

मागील काही दिवसांपूर्वी देवळाली येथील एका खासगी दुकानात विक्रीस आलेले बनावट पनीर अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ११०० किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. गुजरात वरून एक ट्रॅव्हल्स (nashik gujrat travls)मधून नाशिकला हा खवा आणला होता. आता हा खवा कोणी मागवला होता याचा तपास अन्न आणि औषध प्रशासन विभाग करत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात बनावट खवा विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे . या आधी त्रंबकेश्वर, देवळाली, सिन्नर या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे.

यात पनीर खावा असे लाखों रुपये किमतीचे बनावट पदार्थ जप्त करण्यात आहे एकीकडे गणेशोत्सव काळात नाशिक जिल्ह्यात औषध आणि प्रशासन विभागाकडून बनावट पदार्थांच्या विरोधात वारंवार कारवाई करण्यात येत असली तरीही शासनाकडून सुट्टे तेल व इतर अन्न पदार्थ विक्रीस खास परवानगी देवून एक प्रकारे भेसळ करण्यास मुभा दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.