भाजपच्या ‘त्या’ १२ आमदारांच्या निलंबनाबाबत मोठा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी
भाजपच्या निलंबित १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाने आजही दिलासा दिला नसल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासंदर्भात गैर वर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना वर्षभर निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती मात्र यावेळी निलंबन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने भाजप गोटात तणावाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर त्या १२ आमदारांबाबत भवितव्य टांगणीला लागले आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारीला असून सुप्रीम कोर्टाच्या पुढील सूनावणीवर भाजपचे लक्ष लागून आहे.