मनपाच्या आयटीहब साठी खाजगी भूखंडाची जमवाजमव

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये १५ एकर जागेवर आयटी हब उभारण्याला मान्यता मिळाल्यानंतर आता मनपाकडून जागेची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे.

नुकतेच नाशिकला आयटी हब उभारण्यासाठी केंद्राची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर शहरातील आडगाव शिवारात हा आयटी हब उभारण्यात येणार आहे. यासाठी आता खाजगी भूखंडाची चाचपणी करण्यात येत आहे.

नाशिक मनपाने यासाठी स्थानिक खाजगी जमीन मालकांकडून प्रस्ताव मागवले असून आयटी हब च्या क्षेत्र विस्तारणीसाठी खाजगी जमीन मालकांना साकडे घालण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योजकांना गुंतवणूक करायची आहे. त्यांना देखील महापालिकेच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान सध्या या आयटी हब साठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांची पाहणी करण्यात येत आहे. याबाबत लवकरच आयटी उद्योगांची परिषद घेणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

आयटी हबच्या जागेसाठी नाशिक मनपा चाचपणी करत असून याबाबत महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.