जालना आंदोलन मागे तर नाशकात आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

नाशिक:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील सतरा दिवसांपासून जालना( jalna)जिल्ह्यातील आंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून मराठा समाजाला (maratha reservation )आरक्षण देण्याची भूमिका आहे.

कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या(CM EKNATH SHINDE ) शब्दाला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आज १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन सोडले.

तर दुसरीकडे नाशिकमध्ये(NASHIK MARTAHA RESERVATION ) सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झालीय. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे उपोषण करण्यात येत असून, पुढील ३० दिवस हे उपोषण सुरू राहील.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी सरकारला देण्यात आलाय. जर आरक्षण मिळाले नाही, तर समाजाच्या उद्रेकाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी दिलाय.

मागील सतारा दिवसांपासून मराठा समाज जालना जिल्ह्यात जरांगे पाटील यांच उपोषण सुरू होत . या दिवसात आनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली परंतु जरांगे पाटील ही आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा दौरा उरकवून जालना येथिल आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे.

मराठा समजला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कोणावरही अन्याय न करता मराठा समाजला आरक्षण देणार आसल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल. तर नाशिक मध्ये सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.