मुंबई नाक्यावर जल्लोष, पहा मंत्री डॉ. भारती पवार काय म्हणाल्या …

नाशिक । प्रतिनिधी

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आले असून यात चार राज्यात भाजपने विजय संपादन केला असून नाशिकमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी विजय जल्लोषात साजरा केला.

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब या पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज अवघ्या देशाचे लक्ष निकालापाकडे लागून होत. अखेर पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपने चांगली मुसंडी मारली असून विजय संपादन केला आहे. त्यामुळे देशभर भाजप कार्यकर्त्याकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत, महिलांनी फुगडी खेळत विजयोत्सव साजरा केला आहे.

या प्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. भरती पवार उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या कि, जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास आणि विकासावर विश्वास दाखवला असून या निकालातून जनतेनं काँग्रेसला लोकशाहीची जाणीव करून दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मविआ सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून मविआ सरकारला त्यांच्या चुकीच्या कामांचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान चार राज्यातील विजयानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा केला असून मुंबई नाक्यावर एकमेकांना पेढे भरवून , महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला आहे.