नाशिक । प्रतिनिधी
नाशिक मनपाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे चार ते पाच नगरसेवक आज(ता.२५) शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
नाशिकमध्ये भाजपाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असून भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांसह नगरसेवक आज काढता पाय घेणार असल्याने हि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपासाठी चिंतेची बाब आहे. भाजप चार ते पाच नगरसेवक प्रवेश करणार आहेत. मात्र अद्याप यांची अधिकृतरित्या पुढे आलेली नाहीत. यामध्ये दोन महत्वाच्या नेत्यांचा देखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान भाजपाचे चार ते पाच नगरसेवक आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार असून थोड्याच वेळात नाशिकमधून पदाधिकारी आणि नगरसेवक मुंबई कडे रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री वर आज सायंकाळी ५ वाजता प्रवेश करणार आहे.
या शिवसेना प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपाला चांगलाच महागात पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.