मुंबई । प्रतिनिधी
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून पुढील महिन्यातील २६ तारखेपासून आयपीएल थरार सुरु होणार आहे. २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर २९ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा भारतातच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. मेगा लिलाव पार पडल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकांकडे चाहत्यांचं लक्ष लागले होते. यावेळी आयपीएल स्पर्धेच्या लीग सामन्याचे आयोजन मुंबई आणि पुण्यात केले जाणार आहे.
मुंबई आणि पुण्यातील चार मैदानात ७० सामने खेळवले जाणार आहेत. पुण्यात १५ सामने होण्याची शक्यता आहेत. लवकरच आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जारी होणार आहे. गुरुवारी आयपीएलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान काही दिवसांवपूर्वीच या स्पर्धेचे खेळाडूंचे लिलाव पार पडले. आयपीएलमध्ये यंदा आठच्या जागी १० संघ खेळवले जाणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायटंस या दोन संघाना यंदा आयपीएलमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे.