भाजप महाराष्ट्राचे तीन तुकडे करणार; विरोधी पक्षनेते दानवेंचा नाशकात हल्लाबोल

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे असे खळबळजनक वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले असून त्यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. अमित शहा मुंबईत असून त्यांच्या या दौऱ्यावर देखील विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली आहे. सध्या अंबादास दानवे नाशिकमध्ये असून आज सिन्नर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी ते सिन्नर दौऱ्यावर जाणार आहेत.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल

आगामी महापालिका निवडणुका येत असून राज्यात नवी समीकरणे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेवर आपली सत्ता असावी अशी महत्वाकांशा घेऊन भाजप शड्डू ठोकून पूर्ण तयारीत निवडणुकांसाठी उतरला आहे. भाजपने शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सोबत घेऊन निवडणुकांत उतरला असून शिवसेनेला पुरत कोंडीत पकडले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येणार असा दावा त्यांनी नाशकात केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सिन्नर दौऱ्यावर

मागील तीन, चार दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सरस्वती नदीने रौद्ररूप धारण केले होते, पाणी बाजारपेठेमध्ये घुसले असून जीवितहानी सोबतच बाजारपेठेला आर्थिक फटका देखील बसला होता, तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे मंत्री गिरीश महाजनांनी देखील शनिवारी सिन्नर येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती. आणि आज विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सिन्नर दौऱ्यावर असून सिन्नरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी ते करणार आहेत.

नेतेमंडळी फक्त पाहणीच करताय मात्र नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत

सिन्नर मध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले तसेच जीवितहानी देखील झाली. नेते मंडळी येऊन दौरा करताय मात्र नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नागरिकांना अजूनही कोणत्याच प्रकारची ठोस मदत झालेली नसून टी मदत कधी होणार असा सवाल त्यांचाकडून विचारला जात आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे खळबळजनक वक्तव्य

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सध्या नाशिकमध्ये असून ते काही प्रसार माध्यमांशी बोलत असतना त्यांनी भाजपबद्दल खळबळजनक वक्तव्य केला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे असे दानवे यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरेल.