नाशकात मालिकांच्या फोटोला जोडे मारत भाजपचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी नाशिकमध्ये भाजप आक्रमक झाले असून जोडे मारो आंदोलन भाजपकडून सुरु झाले आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.

महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मंगळवारी ईडीने अटक केली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयानं मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी (Nawab Malik ED Custody) सुनावली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनाची हाक दिली. तर दुसरीकडे मालिकांच्या समर्थनार्थ सरकारमधील मंत्री आणि नेते आंदोलन (Mahavikas Aghadi Agitation) करीत आहेत.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा राज्यभर निदर्शने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मलिक यांच्या फोटोला जोडे मारत नाशिक भाजप चे आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनादरम्यान आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ जर राष्ट्रवादी आंदोलन करत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे आंदोलकानी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांना कोठडी सुनावल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.