शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमदारू पिऊन आल्याचे विचारताच मुलाने घेतला आईचा जीव

दारू पिऊन आल्याचे विचारताच मुलाने घेतला आईचा जीव

नाशिक । प्रतिनिधी
दारू पिऊ आला का असं विचारल्याचा रागात एका मुलाने आपल्या आईचा खून केल्याची घटना नाशिकमधील पंचवटीत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पंचवटीतील मेरी कॉलनीत पवार कुटुंबीय अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्रशांत हा त्यांचा मुलगा. प्रशांतला दारू पिण्याचे व्यसन होते. काल सायंकाळी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आल्यानंतर त्याच्या आईने दारू पिऊन का आला असे विचारले. यावर रागाच्या भरात प्रशांत याने त्याच्या ६० वर्षीय आईला जोरात ढकलून दिले. यावेळी तिच्या डोक्याला मार लागल्याने खाली पडून आईचा मृत्यू झाला.

एकीकडे आई आणि मुलाचे नात्याला सुंदर नाते म्हटले जाते, मात्र इथे आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने हृदय हेलावले आहे. या घटनेनंतर संशयीत आरोपी प्रशांत पवार यास पोलिसांनी अटक केली आहे. मात्र एका आईला आपला जीव गमवावा लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्यास अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप