Home » कोरोनामुळे यंदाचा ‘हलवा समारंभ’ रद्द

कोरोनामुळे यंदाचा ‘हलवा समारंभ’ रद्द

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

दिल्लीतील साथीची परिस्थिती पाहता यावर्षी प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) च्या आधी होणारा पारंपारिक “हलवा समारंभ” (Halwa Ceremony) वगळण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचा दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा त्यांचा दुसरा अर्थसंकल्प असेल. दरम्यान केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही अर्थसंकल्प पेपरलेस असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) ०१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. गुरुवारी एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की, “केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात चिन्हांकित करण्यासाठी मुख्य कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी ‘लॉक-इन’ दरम्यान यंदा हलवा समारंभाऐवजी मिठाई देण्यात आली. सध्याची साथीची परिस्थिती आणि आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्याची गरज लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.”

दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या छपाईचे काम केले जाणार असून त्याची सुरुवात हलवा समारंभाने होते. मात्र यंदाही कोरोनाची सावट असल्याने मिठाई वाटून हलवा समारंभ साजरा करण्यात येणार आहे.

हलवा समारंभामागे श्रद्धा ही आहे की प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी काहीतरी गोड खावे, तसचं भारतीय परंपरेत हलवा हा देखील अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळेच बजेटसारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी कागदपत्रांच्या छपाईपूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो. या परंपरेनुसार विद्यमान अर्थमंत्री स्वत: अर्थसंकल्पाशी संबंधित कर्मचाऱ्यांना, अर्थसंकल्पाच्या छपाईशी संबंधित कर्मचारी आणि वित्त अधिकाऱ्यांना हलव्याचे वाटप करतात. हा हलवा तयार करून वितरित केल्यानंतरच बजेटची कागदपत्रे छापण्याची प्रक्रिया सुरू होते.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!