Home » पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
महाकाय वृक्षाला वाचविण्यासाठी नाशिककर एक झाले, आंदोलने झाली, दोन हजाराहून हरकती नोंदविण्यात आल्या. या प्रकरणाची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली. आणि मनपा प्रशासनाला आराखडा बदलण्याची सूचना केली. याच पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये असून १२ वाजता सावरपाडा येथील आदिवासी पाड्यांना देणार भेट आहेत. दुपारी बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन वाजता नाशिक शहरात होणाऱ्या उड्डाणपुलामध्ये कत्तल होणाऱ्या झाडांची करनार पाहणी करण्यात येणार आहे.

त्यांनतर या दौऱ्यात ते उंटवाडीतील महाकाय वटवृक्षाला भेट देऊन वृक्षाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर गंगापूर धरणावरील बोट क्लबला भेट देतील. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्याची पर्यटन आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक विभागाची माझी वसुंधरा अभियानातंर्गत आढावा बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!