Home » केटीएचएम कॉलेजसमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

केटीएचएम कॉलेजसमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या केटीएचएम कॉलेजसमोर बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्री घरी जात असताना अचानक गाडी स्लिप झाल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आदर्श श्रीनिवास दास असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री कामावरून घरी जात असतांना हा अपघात घडला. रात्री दीड वाजेच्या सुमारास जुन्या गंगापूर नाक्याकडून अशोक स्तंभाकडे आपल्या स्वतःच्या मोटरसायकलने (एमएच १५ एकजी ९६२५) जात असताना गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालया समोरील डिव्हायडरवर स्वतः धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात तो खाली पडल्याने त्याच्या डोक्यास, दोन्ही गुडघ्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर दुखापत झाल्याने आदर्श यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आदर्श हा बेंगलोर येथे राहणारा आहे. त्याच्या पश्चात त्याची आई आणि वडील आहेत ते सध्या बेंगलोर च्या त्याच्या घरी आहेत. तर आदर्श नाशिकमध्ये कामानिमित्त आला होता. आदर्श सध्या त्यांच्या मित्रासोबत नाशिकमध्ये राहत होता.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!