Home » सिडकोमध्ये आरपीआय कार्यकर्त्यावर अज्ञाताकडून गोळीबार

सिडकोमध्ये आरपीआय कार्यकर्त्यावर अज्ञाताकडून गोळीबार

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
आरपीआयचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर उत्तम नगर परिसरातील फडोळ चौक या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल जवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

नवीन नाशिक परिसरातील उत्तम नगर येथील फडोळ मळा या ठिकाणी एका मेडिकल स्टोअर जवळ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री साडे अकरा च्या दरम्यान घडलीय. त्यांच्या मांडीवर पिस्तूलच्या दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबार नेमका कोणी केला व का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.

याकरिता परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी शुभम पार्क येथे एका गटांमध्ये राजकीय कारणातून एकास धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून येथील पंधरा ते वीस वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती. त्यात आता गोळीबार झाल्याने सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!