Home » नाशिकरोडच्या जय भवानी रोडवर बिबट्या सीसीटीव्हीत कैद

नाशिकरोडच्या जय भवानी रोडवर बिबट्या सीसीटीव्हीत कैद

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील उपनगर (Nashik City ) परिसरात सकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दर्शन (Leopard) झाले आहे. दरम्यान, दोन ठिकाणी बिबट्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

उपनगर परिसरात जय भवानी रोड परिसरात आज सकाळी स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र घटनेची माहिती मिळताच बिबट्याच्या शोधार्थ वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले होते. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून भरवस्तीत बिबट्याचे सकाळी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सध्या वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू आहे. सदर बिबट्या सीसीटीव्ही मध्ये दिसत असून गल्लीबोळातून फिरताना दिसून येत आहे. नाशिकरोडच्या पुर्व भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असल्याचे या घटनेवरून पाहायला मिळते आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!