दिंडोरीतील ठेपणपाड्यात अफुची शेती, आठ लाखांचा अफु जप्त

नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची शेती केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दिंडोरी पोलिसांनी सदर सीमांवर कारवाई करत ८ लाखांची अफुची झाडे जप्त केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफुची शेती असल्याची गुप्त बातमी दिंडोरी पोलिसांना समजताच रविवारी दिंडोरी पोलिसांनी ठेपणपाडा शिवारातील शेत मध्ये विनापरवाना अफु या अमली पदार्थाच्या झाडाची लागवड केलेली मिळून आले. सदरील शेतातील सर्व अफु दिंडोरी पोलिसांनी जप्त केली. यावेळी पांढऱ्या प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये वेगवेगळया वजनाच्या एकुण ४३ गोण्या हिरवे अफुची झाडे देखील यामध्ये ताब्यात घेण्यात आली आहेत.

या कारवाईत एकूण ८०३ किलो वजनाची ८ लाख किमतीचा अफु दिंडोरी पोलिसांनी जप्त करून अंमली व औषधीद्रव्य मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम १८ प्रमाणे शेतमालक कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे (वय.३८ वर्षे,) रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि.नाशिक, दिपक लालसिंग महाले (वय.४२) मुळ रा. दुसाणे बडसाणे, ता. साकी, जि. धुळे, ह.मु.कुश व बिल्डींग रूम नं. ११, आदर्श नगर, राऊ हॉटेलच्या मागे, पेठ रोड, नाशिक. तसेच मोहन वामन दळवी (वय ३६) मुळ रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक, ह.मु. अथर्व रोहाऊस नं. २९ इंद्रप्रस्थनगर, पेठरोड नाशिक. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस बाळकृष्ण पजई, एस.पी.धुमाळ आदी दिंडोरी पोलिस करीत आहेत.