517
नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या मानवता कॅन्सर रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली. अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.०३) रोजी मुंबई नाका येथिल नामांकित हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत दिलेल्या कामानुसार लिफ्टच्या दारावर पोस्टर चिपकवतांना हि घटना घडली होती. यावेळी अश्फाक नगीनेवाले हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडल्याने त्याला जबर मार लागून त्याचा दुर्देवी मुत्यु झाला होता. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान या प्रकरणी मानवता कँसर हॉस्पिटल प्रशासन, ठेकेदार आणि लिफ्ट मॅन विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.