रंगपंचमी नडली! बेंजो वाजवल्याप्रकरणी पाच मंडळावर गुन्हे दाखल

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरातील पाच रंगपंचमी मंडळावर भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रंगपंचमीला डीजेवर बंदी असताना बेंजो लावत उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. मात्र यंदाच्या रंगपंचमीला डीजेवर बंदी आणण्यांत आली होती. असे आदश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिले. होते. त्यामुळे यंदाची रंगपंचमी डीजेशिवाय साजरी करण्यात आली. मात्र काही मंडळांनी बॅन्जोचा तालात रंगपंचमी साजरी केली.

तयामुळे बँजो लावत नियम व अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून शहरातील पाच मंडळावर भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिजेला परवानगी नाकारत पारंपारिक वाद्य वाजवण्याच्या पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या सूचना होत्या. मात्र काही बेंजो लावल्याने हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आता या घटनेने पोलिस आणि मंडळां मधील वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत.