धक्कादायक ! नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवनाथ फापाडे (Shivnath Fapade) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे (ST Worker) नाव आहे. ते चालक म्हणून शहापूर आगारात (Shahapur ST Depo) कार्यरत होते. गेले आठ वर्षापासून फापाडे  एसटी महामंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. फाफाडे यांनी आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आगाराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलिसांनी (Nashik police) देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे

गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलगीकरण व्हावे ही फापाडे यांची इच्छा होती. मात्र विलगीकरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

अशातच शिवनाथ फापाडे देखील आर्थिक संकटात सापडले होते. यातून पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ कसा करावा, या विवंचनेत शिवनाथ यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.