सावधान; ‘झिका’ विषाणू नाशिकच्या वेशीवर

पालघर : जिल्ह्यात संसर्गजन्य ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळला आहे.झिका हा संसर्गजन्य विषाणू आहे. झिका विषाणूची लागण अवघ्या सात वर्षाच्या मुलीला झाली आहे. ही मुलगी झाईच्या आश्रमशाळेतील रहिवासी आहे. या मुलीवर सध्या उपचार सुरु आहे.हा विषाणू संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेतली जाते आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या विषाणूचे निदान होताच मुलीला तात्काळ आरोग्य विभागाने डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले आहे. झिका विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणवर होतो, तो होऊ नये यासाठी खबरदारी देखील घेतली जात आहे.


झिका विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आढळला होता. कोरोना महामारी, पूरानंतर राज्यावर झिकाचं संकट घोंगावत आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने देखील तयारी सुरु केली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.झिका विषाणू बद्दल अजूनही नागरिकांमध्ये जागरूकता नाही पण हा विषाणू अत्यंत घातक असा आहे. त्यामुळे ह्या विषाणूचा संसर्ग कसा होतो. आणि हा संसर्ग कसा थांबवता येईल याची खबरदारी ही नागरिकांनी घेतली पाहिजे. व झिका रुग्णाची लक्षणे दिसल्यास तत्काळ आपल्या जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेतले पाहिजे. याने झिकाचा संसर्ग वाढणार नाही व आपल्यासोबतच आपल्या आजुबाजुचीही काळजी घेतल्या जाते. खबरदारी घ्यावी असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

झिका विषाणू आहे कसा किंवा तो पसरतो कसा?
डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग होतो. डासांच्या एडीज प्रजातीद्वारे या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. या एडीज डासांमुळे डेंग्यु आणि चिकनगुनिया आजाराचा देखील प्रसार होतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते. हे डास इतर व्यक्तींना चावल्यास त्यांनाही झिका विषाणूची लागण होते.त्यामुळे डासांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

झिका विषाणूची लक्षणे काय आहेत?
 झिका विषाणूची लक्षणे ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. त्यात पुरळ, स्नायू दुखणे, उलट्या, डोकेदुखी,
डेंगी, हिवताप, चिकनगुन्या आदी आजारांची साथच तयार होते. यातच गरोदर महिलेला जर या विषाणूची लागण झाल्यास मुलांमध्ये मेंदूचे दोष निर्माण होऊ शकतात असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पावसाळ्यामुळे डासांचे प्रमाण वाढते,त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. डासांमार्फत ह्या विषाणूचा प्रसार होतो त्यामुळे योग्य त्या उपाय योजना करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.