शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमचांदवडच्या ड्रायफूट व्यावसायिकाची नऊ लाखाची फसवणूक

चांदवडच्या ड्रायफूट व्यावसायिकाची नऊ लाखाची फसवणूक

चांदवड । प्रतिनिधी

चांदवड येथील ड्रायफूट व्यवसायिकाची नऊ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुजरात येथील व्यापाऱ्याने माल कमी नऊ लाखांना गंडा घातला आहे.

संदीप शिरसाठ असे चांदवड येथील फसवणूक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. संदीप शिरसाठ यांचा ड्रायफ्रूट चा व्यवसाय आहे. ते राज्यातील अनेक ठिकाणहून ड्रायफ्रूट खरेदी करीत असतात. यावेळी त्यांनी गुजरात येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत ड्रायफ्रुटची मागणी केली. हि खरेदी करताना पैसे हे ऑनलाईन पाठवण्याचे ठरले.

शिरसाठ यांनी माल बघून तो खरेदी केला. तसेच या मालाचे पैसे त्यांनी व्यापाऱ्यास ऑनलाईन पाठवले. त्यानंतर दोन दिवसांनी शिरसाठ यांना माल मिळाल्यानंतर पैसे अधिकचे देऊन माल कमी मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तब्बल नऊ लाख ११ हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुजरात येथील व्यापारी जितेंद्र परमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवडचे व्यापारी संदीप शिरसाठ ड्रायफूट व्यवसाय करत असून विविध ठिकाणाहून ते वेगळ्या कंपनीचे ड्रायफूट मागत असतात. अशाच प्रकारे गुजरात येथील व्यापारी यांच्याकडून ड्रायफूट मागवले असता मागवलेल्या एकूण मालापेक्षा कमी माल चांदवडच्या व्यापाऱ्यास मिळाल्याने नऊ लाख रुपयांचा कमी ड्रायफूटचा माल असल्याने या व्यापाऱ्याने गुजरातच्या व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप