छत्रपती संभाजीराजेच्या तीन दिवशीय उपोषणात काय काय घडलं? वाचा सविस्तर

मुंबई | प्रतिनिधी
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

दरम्यान (दि.१५) रोजी पत्रकार परिषद घेत (दि.२६) फेब्रुवारी पासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळत होता. त्यानंतर ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले.

दरम्यान, पहिल्या दिवशी संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच पहिल्या रात्रीचा मुक्काम केला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर, दिलीप देसाई यांनी भेटी दिल्या. त्यांनतर मागण्यांसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य समन्वयक आणि संभाजीराजे यांनी चर्चा केली.

विशेष म्हणजे राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संभाजीराजेंच्या मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संभाजी राजेंची विचारपूस केली. डॉक्टरांच्या माध्यमातून दर सहा तासाला तपासणी करण्याचे डॉक्टरांना सूचना त्यांनी केल्या. तर त्याचवेळी संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विनंती केली.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ठरली. मात्र तत्पूर्वी संभाजीराजेंचा ब्लड शुगर आणि रक्तदाब कमी झाला. मात्र यावर संभाजीराजे नी औषधे घेण्यास नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर २० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. यामध्ये १८ समन्वयक आणि ०२ विद्यार्थी असं २० जणांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान इकडे कोल्हापूरात दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याचवेळी उपोषण स्थळी काही वारकऱ्यांनी भेट दिली. अभंग, भजन त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याने संभाजीराजे यावेळी भावुक झाले. तर शेगाव येथील शिवाजी चौकात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला.

दरम्यान सायंकाळी उशिरा सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे नी उपोषण सोडले. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी देखील त्यांच्या बरोबर अन्नत्याग केला. होता. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी सुरवातीला त्यांच्या पत्नीला सरबत देत कौतुक केले. आशा पद्धतीने उपोषणाची सांगता झाली. आणि छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारचे आभार मानले.