सिडको परिसरात इसमावर कोयता व चॉपरने वार

नाशिक | प्रतिनिधी

सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांनी शहर हादरले आहे. सिडको भागात एकावर कोयता आणि चॉपरने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली आहे.

सिडको भागातील शिवनेरी गार्डन परिसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केली असून कोयता व चॉपरच्या वार केले आहेत.

या घटनेत सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू अंबड पोलीस करीत आहेत.