राज्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढला

नाशिक | प्रतिनिधी
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ने राज्यभर पाय पसरायला सुरवात केली आहे. पुणे, मुंबई पाठोपाठ आता नागपुरात ओमायक्रोन चा शिरकाव झाला आहे.

दरम्यान राज्यातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती वाढत असून या व्हेरिएंटने नागपूरला प्रवेश केला आहे. नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या परदेशी व्यक्तीचा रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या इतर व्यक्तीचे रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहे.

नागपूरला पहिला रुग्ण आढळल्यानंतर नाशिक मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. तर नागपूर मध्ये आढळलेल्या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची डॉक्टरांनी दिली आहे.

महत्वाचे म्हणजे या रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या कुटुंबामधील इतर सदस्यांची कोविड चाचणी घेण्यात आली होती. मात्र, सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असल्याने प्रशासनाने सुटकेचा निस्वास सोडला आहे. दरम्यान, राज्यात ओमायक्रोन रुग्णांची संख्या आता १८ वर येऊन पोहोचवली आहे.