शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमपोलिसांसमोरच नागरिकांच टोकाच पाऊल

पोलिसांसमोरच नागरिकांच टोकाच पाऊल

नाशिकच्या कामाटवाडा परिसरात असलेल्या एका मेडिकल शॉपमध्ये संशयित तरुणाने दमबाजी करत तोडफोड केली. विनाकारण या तरुणाने मेडिकलमध्ये असलेल्या लोकांना दमबाजी करतात तोडफोड केल्याचा आरोप तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केला.

या संपूर्ण घटनेनंतर मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, त्यातच या तरुणाने इतर लोकांनाही दमबाजी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांसमोरच तोडफोड करणाऱ्या या संशयिताला चोप दिला.

काही नागरिकांनी तरी या तरुणाला काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी चोप दिल्याने या घटनेनत हा संशयित तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा संशयित तरुण मेडिकल मध्ये नेमकं कुठल्या कारणामुळे तोडफोड केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या संपूर्ण घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप