पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर कोसळल्याने चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी अंगावर कोसळून एका 14 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ,अमृता नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि ,14 वर्षीय आरसी जमील ही आपल्या लहान भावासोबत खेळत असतांना अचानक घराजवळील पाण्याच्या टाकीची भिंत या खेळत असलेल्या दोघा भावंडांच्या अंगावर कोसळली आणि या भिंती खाली दोघे या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले.

या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आरसी जमील या चौदावर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,तर तिच्यासोबत खेळत असलेला लहान भाऊ हा या घटनेत बाल बाल बचावला त्याला काही झाले नाही पण दुर्दैवाने आरसी ही या मलब्याखाली अडकल्याने तिला वाचविण्यात अपयश आले.या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.