Home » इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद.

इगतपुरीत दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद.

by नाशिक तक
0 comment

इगतपुरी परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर वनविभागाकडुन लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.बिबट्या जेबंद झाल्याने इगतपुरी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.


नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले आणि वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याच गेल्या काही दिवसात समोर आले आहे.काही दिवसांपूर्वी घरात घुसून याच बिबट्याने हल्ला करत एका व्यक्तीला गंभीर जखमी करत धूम ठोकली होती.ही घटना ताजी असताना आता
इगतपुरी परिसरातील शिवाजी नगर भागात बिबटयाचा बछडा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी नगर व परिसरात या बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता.या बिबट्याच्या धुमाकूळ आणि नागरिकांवरील हल्ल्यांमुळे परिसरात या बिबट्याची मोठी दहशत पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.त्यानंतर येथील राहिवाश्यांकडून बिबट्या जेरबंद करण्यासाठी मागणी होत होती.वनविभागाने तातडीने याची दखल घेत परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.अखेर आज हा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.तर बिबट्याच्या या बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!