गाडी टोईंग थांबवा आधी पार्किंगला जागा द्या!

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरात (Nashik City) वाहने पार्किंगची समस्या (Vehicle parking problem) दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच शहरात मुख्य बाजारपेठ असो की, वर्दळीचा परिसर बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून (Nashik Traffic Police) वाहने टोईंग (Vehicle Toing) केली जातात. मात्र आता नागरिक या मोहिमेला विरोध करता असून वाहने पार्किंग साठी जागा उपलब्ध करून अशी मागणी होत आहे.

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र त्या बदल्यात पार्किंगची (Parking Place) जागा अत्यंत कमी असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यासाठी नाशिक पोलिसांकडून वाहन टोईंग चा बडगा उगारण्यात आला होता. आणि आजही वर्दळीच्या भागात टोईंग व्हॅन (Toing Van) द्वारे वाहने उचलली जातात. यामुळे अनेकदा नागरिक , पोलीस आणि टोईंग व्हॅन धारक यामध्ये वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. अनेकदा यावर नाशिककरांनी आवाज देखील उठवला आहे. आता पुन्हा टोईंग चा प्रश्न उपस्थित होत असून नागरिक याला विरोध करत आहेत.

नाशिक शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने हटवण्यासाठी पोलिस विभागाने टोईंग व्हॅन सुरु केले असले तरीही नागरिक मात्र याला जोरदार विरोध करीत आहेत. टोईंग बंद करा,अन्यथा पार्किंगची व्यवस्था त्वरित सुरू करा , पार्किंगची व्यवस्था नाही तरी वाहतूक विभागाकडून कारवाई कशी होते, त्यामुळे पार्किंगला जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी जोर धरत आहे. काही महिन्यापूर्वी यावर तोडगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचा घाट घातला जात होता. मात्र कालांतराने यावर काहीही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रकल्पही बासनात गुंडाळण्यात आल्याचे दिसून येते.

दरम्यान शहरात पुरेशी पार्किंगची सुविधा कराव्या तसेच रस्त्यावर नो पार्किंगचे फलक लावावे त्यानंतरच टोईंगची कारवाई करण्यात यावी, तसेच वाहतूक विभागाने पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.