नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच, एकाच दिवशी १९९६ बाधित

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कोरोना रुग्णांचा (Corona Patient’s) उद्रेक झाला असून काल जिल्ह्यात दिवसभरात १९९६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( Corona reports Positive) आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त (Nashik Administration) अहवालानुसार मागील चोवीस तासात १९९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात १५०३, नाशिक ग्रामीण विभागात ३५१, मालेगाव ४२, तर जिल्हाबाह्य १०० अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दिलासादायक म्हणजे काल दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही. मात्र आतापर्यंत मृत्यूचा आकडा हा ८ हजार ७६६ वर आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३९ टक्क्यांवर पोहचला असून नाशिक ग्रामीणचे १४१६ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये १४४ कलम लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.