नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील एका एटीएममध्ये सराईत चोरट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालाय. शहरातील भद्रकाली परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. भद्रकालीतील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना हेरून मदतीच्या बहाण्याने पैशांची लूट चोरांनी केली आहे.
एटीएम मध्ये झालेल्या या चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून चोराने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना हेरून मदतीच्या बहाण्याने पैशांची लूट केली.
दरम्यान भद्रकाली पोलिसांकडून या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आल्यानंतर केवळ मौजमजेसाठी हा गुन्हेगार वृद्ध आणि महिलांना गंडा घालून पैशांची लूट करायचा असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. सोबतच या आधीही अनेक वेळा या चोरट्याने हातचलाखीने एटीएमची अदलाबदली करून नाशकात अनेकांना गंडा घातल्याचं समजते आहे.
अशात एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक करत वाढत चाललेल्या अशा चोरीच्या घटनांमुळे एटीएमचा वापर करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे.