नाशिक | प्रतिनिधी
येथील तरण तलाव परिसरात मद्यधुंद टँकर चालकाने एकापाठोपाठ एक अशा चार वाहनांना धडक दिली आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबक रोडने दुपारच्या सुमारास चारचाकी भरधाव वेगात नाशिक शहरात प्रवेश करत होता. चालकाने भरपूर प्रमाणात मद्यप्राशन केले होते. तरण तलावाजवळ आल्यानंतर त्याचा ताबा सुटला आणि समोर असलेल्या दोन दुचाकी, चार चारचाकी वाहनांना धडक देतच पुढे जाऊन धडकला.
या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी असून मद्यधुंद वाहन चालकाला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.