Video : नाशकात पोलिसांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात मारहाणीच्या घटना म्हणजे किरकोळ गोष्ट झाली असून आज दोन बहादरांनी चक्क पोलिसांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना घडली.

इथे पहा व्हिडीओ :

https://youtu.be/aZew6CoQzP4

नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारांचे चांगलच फावत असून दिवसा ढवळ्या शहरात हाणामाऱ्या होत आहेत. खून, दरोडे यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगार पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते.

आज सायंकाळच्या सुमारास जलतरण तलाव परिसरात चक्क पोलिसां समोरच दोन जण आपआपसात भिडले मग काय? सुरू झाली फ्रि स्टाईल हाणामारी. अगोदर तर पोलिसानी बघ्याचीच भूमिका घेतली, मात्र बघ्यांची संख्या वाढल्याने नंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत वाद मिटवला.

जर पोलिसांसमोर अशा हाणामाऱ्या होत असतील. आणि पोलीस गुपचूप बसत असतील तर गुन्हेगारीला आळा बसणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.