मोठी बातमी ! कोरोनाचा ओमायक्रोन व्हेरिएंट भारतात पोहचला!

मुंबई | प्रतिनिधी
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता भारतातही चिंता वाढली आहे. 

भारताची चिंता वाढण्याचे कारण म्हणजे कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळुन आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.

नवा व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.