दिंडोरी | संतोष कथार
जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, दिंडोरी मध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील इयत्ता ९ वी ई च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्य सादर केले. पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे एड्स बद्दल जागरूकता निर्माण केली. विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका श्रीमती कांगणे मॅडम यांनी एड्स जनजागृती बद्दल माहिती सांगितली. सकाळ सत्रात श्रीम उशीर यु टी यांनी एड्स दिनाचे महत्व, खबरदारी, आणि या आजाराविषयी गैरसमजुती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने एड्स सारख्या भयावह रोगाविषयी जागरूकता निर्माण करून समाजातील प्रत्येकाने त्याबद्दल नियम पाळणे आवश्यक आहे . तरच आपण त्यापासून आपला बचाव करू शकतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो.
याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक यु डी भरसट, पर्यवेक्षक यु डी बस्ते, जी व्ही आंभोरे, श्रीम एन पी बागुल आदी उपस्थित होते. तर आहेर एस एस यांनी आभार प्रदर्शन केले.