मोठी बातमी! अखेर परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई?

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या सात ते आठ महिन्यापासून गायब असलेल्या तसेच तत्कालीन गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह निलंबन करण्यात आले आहे. ठाकरे सरकारने परमबिर सिंग यांस चांगलाच झटका दिला आहे.

मात्र अद्याप या बातमीला दुजोरा मिळाला नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्याने चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.

त्यानुसार आज परमबिर सिंग बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला गेला आहे.

तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबिर सिंग यांच्या निलंबनाबाबत सूतोवाच केले होते. ते म्हणाले होते की, ‘बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.