Video : सावधान ! तुम्ही खात असलेला वडापाव शिळा तर नाही ना ?

नवीन नाशिक | सागर चौधरी

शहरातील उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून सदर दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तमनगर च्या छोटू कोल्हापूरी वडापाव च्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल यांचे सॅम्पल जप्त करण्यात आल्या आहेत. तर सदर दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://youtu.be/OFi_rFsNjV0

सदर छोटू कोल्हापुरी या दुकानात वडापाव तळताना वापरण्यात येणारे तेल हे बदलले जात नाही. तसेच वडापाव चिकी टिक्की ही डीप फ्रिझर मध्ये ५ ते ६ दिवसांपर्यंत ठेवलेली असते, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांनी प्रशासनाला केली होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन नवीन नाशिक विभागाचे निरीक्षक व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.