देवळा जळीतकांड प्रकरणातील ‘त्या’ युवकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जळीत कांड प्रकरणातील त्या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी लोहोणेर येथे ही हृदयद्रावक घटना घटना घडली होती. दिवसाढवळ्या गोरख बच्छाव नामक युवकाला प्रेमप्रकरणातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये हा युवक गंभीर भाजला होता. अखेर आज रात्री अकराच्या सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

लोहोणेर येथील घटनेनंतर संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता. य प्रकरणी मुलीच्या घरच्या देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना आजचा पुढील पाच दिवस पोलीस कोठडी देखील सुनावली होती. मात्र आजच नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल आलेल्या या युवकाची प्राणज्योत मालवली आहे.

दरम्यान रात्री अकराच्या सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.