उपमुख्यमंत्री फडणवीस यांची दत्तक नाशिकला ‘ ही ‘ भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दत्तक नाशिकला एक भेट दिली आहे . ती म्हणजे नाशिकच्या 300 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे . नाशिक शहराची लोकसंख्या वाढत असून शहरात निर्माण होणाऱ्या पाणी वितरण व व्यवस्थापना बरोबरच शुद्ध पाणी देण्याचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे . गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा आधुनिकरण योजनेचा 300 कोटींच्या प्रस्तावाला शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकित मान्यता दिली आहे .नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गोदातीरी झालेल्या सभेत ही योजना मार्गे लावण्याची आश्वासन दिले होते आता राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर केंद्र पुरस्कृत अमृत दोन अभियानाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव रावांना होणार आहे. 2018 मध्ये राज्य शासनान महापालिकेकडून या संदर्भातील प्रस्ताव मागून अमृत योजनेच्या पहिल्याच टप्प्यात निधी देण्याची तयारी सुरू केली होती.

पालिकेत भाजपची सत्ता असताना पाणीपुरवठा विभागाने 226 कोटींचा आराखडा जीवन प्राधिकरणाला सादर केला होता .मात्र राज्यात पुढे भाजपचे सरकार गेल्यानंतर हा प्रस्ताव रखडला होता गेल्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल ढिकले यांनी या प्रस्तावा बाबत लक्षवेधी मांडल्यानंतर तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील केंद्र शासनाच्या अमृत दोनच्या योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक सह राज्यातील सर्वच पाणीपुरवठा योजना व मलनिस: सारण योजनांना मंजुरी दिली आहे. या पाणीपुरवठा योजने संदर्भात राज्य शासनाला फेर प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण यांनी दिली आहे .